Headline will come here Headline will come here Headline will come here Headline will come here Headline will come here Headline will come here Headline will come here Headline will come here

डोंबिवलीतील ४ सीबीएसई १०वी जन गण मन शाळेचा ऐतिहासिक १००% निकाल


  मुंबई (प्रतिनिधी)       23/05/2026      महत्वाच्या बातम्या    Share


जाह्नवीज मल्टी फाउंडेशनच्या डोंबिवली येथील जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल (सीबीएसई बोर्ड) ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने शंभर टक्के निकालाची नोंद करत संस्थेने शैक्षणिक उत्कृष्टतेचा मानदंड उंचावला आहे.

यावर्षीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. इवा बनसरी अचिंत्य शो हिने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. यथार्थ सरिता सुधाकर पवार (९५%) आणि सोनाक्षी गायत्री रामबहादुर प्रजापती (९२.४०%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच दिया भावनी दीपक कुंदर (९१.२०%) आणि सार्थक मानसी मंगेश भांबीड (९१%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षकवर्गाच्या समर्पित कार्याचे कौतुक केले.

संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. श्रीमती प्रेरणा कोल्हे आणि मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती वेंकटरामन यांच्या नेतृत्वाखाली शाळा सातत्याने प्रगती करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सर्वांगीण विकास या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धतीमुळे हे यश शक्य झाल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले. या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण असून, शैक्षणिक क्षेत्रातील आणखी एक यशस्वी अध्याय शाळेच्या नावावर नोंदवला गेला आहे.